पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी:- लोकसभेचे बिगुल रत्नागिरीत वाजले असून पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवाराने वाजत गाजत मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शकिल अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष म्हणून शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शन आणि ढोल-ताशांच्या
गजरात मारूती मंदिर येथून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी अॅड. ओवेस पेचकर यांच्या प्रमुख
उपस्थितीत अर्ज दाखल केला. शकिल सावत हे उद्योजक तसेच हॉटेल सावंत पॅलेसचे मालक आहेत.
कोकणचा पर्यटन व सर्वांगिन विकास हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते या निवडणुक रिंगणात उतरले आहे.

जनतेला बदल हावा आहे, चिखल झालेल्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून जनता माझा नक्कीच विचार करेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

…मला विजयाची खात्री

लोकसभेच्या या निवडणुकीत मला विजयाची खात्री आहे. जनतेला बदल हेवा आहे. मला या मतदार संघाचा विकास करायचा आहे. राजकारणाल जनता कंठाळली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून मला जनता नक्की निवडुन देईल. कोकणात चागल्या दर्जाची मेडिकल फॅसिलीटीजी निर्माण करणे हे आपले उदिष्ट आहे.कोकणात उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, येथील तरुणांना चांगला रोजगार मिळावा, अशी प्रतिक्रिया शकिल सावंत यांनी दिली.