कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगाब्लॉक

रत्नागिरी:- पावसाळी हंगाम जवळ येत असल्याने दुरुस्ती कामांसाठी कोकण रेल्वेने मेगाब्लॉक घेण्याचे ठरविले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

आरवली रोड ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी हा अडीच तासांचा मेगाब्लॉक आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र. १२६१७ एर्नकुलम जं. ते निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास ११ एप्रिल रोजी मडगाव जंक्शन येथे एकतास पंचेचाळीस मिनीटांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. २०९२३ तिरुनेलवेली ते गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास ११ एप्रिल रोजी मडगाव जंक्शन ते रत्नागिरी स्थानकादरम्यान एक तासासाठी नियमित केला जाईल. प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.