रत्नागिरी:- तालुक्यातील नरबे फाटा येथे बलकर आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. ट्रक चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश होशियारसिंग राणा असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ७) दुपारी बारा वाजता नरबे फाटा रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बलकर चालक सुजीत फौजदार यादव (वय २६) हे बलकर (क्र. एमएच-०८ एपी १५१५) ही घेऊन जयगड ते निवळी रस्त्याने जात असताना नरबे फाटा येथे समोरुन एक मालवाहू ट्रक असल्याने ट्रक हा हळूहळू जात असतना त्याचे पाठीमागून येणाऱ्या ट्रक (क्र. डीडी-०१ एच ९१५३) हा भरधाव वेगाने आला ट्रक चालकाने ब्रेक लावल्याने ट्रक आवरला नाही त्याने बलकरला ठोकर दिल्याने नुकसान झाले. या प्रकरणी यादव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.