पोट दुखीच्या त्रासाने रत्नागिरी येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- पोट दुखू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सिद्धेश रमाकांत भाटकर (वय ३२, रा. सोहम अपार्टमेंट टिळक आळी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी एकच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश यांच्या पोटात दुखू लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.