चिखली येथे झाड अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- रस्सीच्या साह्याने ओढ लावून झाड तोडत असताना अंगावरच झाड पडल्याने तरुण गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिखली धामणाकवाडी येथे घडली आहे. विवेक सिद्धार्थ मोहिते (राहणार चिखली धामणाकवाडी) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अब्बास सावरटकर आणि विवेक सिध्दार्थ मोहिते हे गावातील तसेच आजुबाजुचे परीसरात मजुरीचे तसेच झाडे तोडण्याचे काम करतात हे दोघे आपले सहकारी यांना घेऊन मौजे चिखली धामणाकवाडी येथे रामजी धामणाक यांचे घराजवळील ऐनाचे झाड रस्सीचा ओढ लावुन कटरच्या साहाय्याने तोडत होते. जमिनिच्या दिशेने खाली झाड पडत असताना ओढ लावलेली रस्सी विवेक मोहिते यांच्या पायाला बसुन झाड पडल्याने त्या रस्सीचा पेच मयत याचे जांगेला बसला. लहान मोठ्या दुखापती अंतर्गत व बांहाबाजुस होवुन त्यास उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. खबर देणाऱ्यांच्या माहितीवरुन सदरचा अ.मू. रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे.