प्रतिबंधात्मक मनाई आदेश उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील कोतवली टेप भोईवाडी येथे एकास त्याच्या मालकीच्या जमिनीत प्रवेश करून त्यास काठीने मारहाण केल्यावरुन जखमी केल्याप्रकरणी ६ जणांवर प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला होता. त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ता. ९ मार्च रोजी घडली. सुनिल सखाराम जाधव (वय ५२ वर्षे) असे जखमी झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तर रश्मी राजु जुवळे, विदुला विजय जुवळे, संजीवनी संजय जुवळे, व संजय भिकाजी जुवळे, सुभाष पांडुरंग पडवळ, विजय विष्णु जुवळे सर्व (रा. कोतवली टेप भोईवाडी ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. यातील फिर्यादी यांचे घराचे समोर फिर्यादी यांचे मालकीचे जमिनीत प्रवेश करून सहा जणांनी फिर्यादीला बांबुचे काठीने व हाताचे थापटाने मारहाण करून शिवीगाळी दमदाटी केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी पारीत केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये लागू केलेल्या मनाई आदेशा चे उल्लंघन त्या सहा जणांनी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलिस अधिक तपास करीत आहेत.