कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये चोरी; ८६ हजार ५५३ रुपयांची मुद्देमाल पळविला

रत्नागिरी:- कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरली. त्यामध्ये सोन्याच्या दागिने, रोख रक्कमेसह ८६ हजार ५५३ मुद्देमाल होतो. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ फेंब्रुवारी सकाळी सहा वाजता कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिजित आप्पाजी सावंत यांची पत्नी सोनाली व आई बागेश्री या ठाणे येथून कोकण कन्या एक्स्प्रेसने कणकवली येथे जात जात असताना चोरट्याने त्यांची पर्स पळविली. यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८६ हजार ५५३ रुपयांची मुद्देमाल होता. या प्रकरणी अभिजीत सावंत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.