रत्नागिरी:- धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर इंस्टाग्राम वरून प्रसारित करणार्या सलमान मुजावर (रा.क्रांतीनगर) याच्यासहित चौघां विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सलमान मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत श्रीधर राऊळ रा. खेडशी यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सलमान मुजावर व अन्य तिघे अशा एकूण चौघांनी आपल्या इंस्टाग्राम आयडीवरून धार्मिक ते निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्या आहेत. श्री राऊळ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सलमान मुजावर याच्यासहित चौघांवर भादंविक कलम १५३ अ, ५०५ (२) २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळूंखे करत आहेत.