बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील सौंदळ पाटीलवाडी येथील ग्रामस्थ दीपक चव्हाण यांच्यावर गुरुवारी रात्री आठ वाजता बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना घडली. या हल्यात दिपक चव्हाण यान्ना हाताला इजा झाली असुन त्यानी आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुचे ग्रामस्थ धावुन आल्याने चव्हाण बचावले.

या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीररित्या जखमी केले आहे. आपल्या घराकडुन सौंदळकडे येत असताना एका वळणावर बिबट्याने अचानक चव्हाण यांच्यावर झेप घेतली त्यामध्ये हाताला इजा झाली असताना सुध्दा त्यान्नी आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकुन आजुबाजुचे ग्रामस्थान्नी तात्काळ आवाजाच्या दिशेंर धाव घेतली त्यामुळे चव्हाण बचावले त्यांच्या हाताला इजा झाली सदरची घटना समजतात उदय हळदणकर या त्यांच्या मित्राने व रायपाटण गावचे तरुण प्रकाश पाठाडे यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी दाखल केले.सदर घटनेबाबत वन विभागाचे अधिकारी सदानंद घाडगे यांना कळवताच त्यांनी तात्काळ रायपाटण रुग्णालय येथे जाऊन जखमीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.ऱायपाटणच्या पोली दुरक्षेत्रचे कर्मचारी कमलाकर तळेकर हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह रायपाटण रुग्णालयात दाखल झाले होते अलिकडच्या काळात बिबट्याने हल्ला केल्याची आणखी एक घटना घडली आहे . काही महिन्यांपुर्वी बिबट्याने राजापूरच्या नायब तहसीलदार दिपाली पंडीत यांच्यावर शहरानजीक हल्ला केला होता या घटनेनंतर सौंदळ परीसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या वेळी ओणी अणुस्कुरा मार्गावर कुठे ना कुठे बिबट्याला अनेकान्नी पाहिले असल्याचे सांगितले.