खेड:- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी नियोजित वरासह त्याचे आई, वडील आणि मुलीचे नातेवाईक अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर यांनी दिली.
सर्वांनी संगनमताने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही हे कृत्य केले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह एका तरुणासोबत लावून दिला. वराने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गर्भवती राहिली आणि तिची प्रसूती झाली. हा बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ च्या कलमांनुसार पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.