रत्नागिरी:- बोटीवर काम करणाऱा खलाशी कुणालाही काही न सांगता निघून गेला. शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी फिशींग करणाऱ्या एका बोटीला एक व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
रमतकुमार धनीराम चौधरी (वय २४, मुळ- कैलाली नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा बोटीवर, रत्नागिरी) असे मृत खलाशी तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) मिरकरवाडा येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमतकुमार हा मच्छीमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. मात्र शनिवारी त्यांच्या कुणालाही न सांगता तो निघून गेला होता. त्याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी (ता. २५) सायंकाळी ६ वाजता ब्रेक वॉटर येथे फिशींग करणाऱ्या एका बोटीला एक अज्ञात व्यक्ती तरंगताना दिसली. त्या व्यक्तीला बोटीतून मिरकरवाडा येथे घेऊन आले असता तो रमतकुमार चौधरी असल्याचे समजले. खबर देणार यांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.