कुमार -मुली गटाचे खो –खो संघ जाहीर ; छत्तिसगड येथे राष्ट्रीय स्पर्धा
रत्नागिरी:- नंदूरबार येथे झालेल्या राज्यअजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी जाहिर केले. हे संघ छत्तिसगड येथे होणाऱ्या ४२ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कुमार संघाच्या कर्णधारपदी वैभव मोरे (ठाणे) तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी दिपाली राठोड (पुणे) यांची निवड झाली आहे. यामध्ये मुली संघात रत्नागिरीच्या आर्या डोर्लेकर हीची निवड झाली आहे.
संघाच्या निवडीसाठी तज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती.
निवडलेल्या संघाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. अरूण देशमुख, संदिप तावडे यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. कुमार गट : वैभव मोरे (ठाणे, कर्णधार), गणेश बोरकर, फराज शेख, कृष्णा बनसोडे (सर्व सोलापूर), चेतन बिका, तेजस जाधव, चेतन गुंडगीळ, भावेश मेश्रे (सर्व पुणे), रमेश वसावे, भरत वसावे, श्रीशंभू पेठे (धाराशिव), ओम पाटील (सांगली), रोहित गावित (नंदूरबार), हर्ष कामटेकर (मुंबई). प्रताप शेलार (प्रशिक्षक, ठाणे), संतोष कर्ऩाळे (सहाय्यक, सांगली), राजेश सोनावणे (व्यवस्थापक, नंदूरबार). मुली गट : दिपाली राठोड (कर्णधार, ठाणे), अश्विनी शिंदे, सुहानी धोत्रे, संध्या सुरवसे, प्रणाली काळे (सर्व धाराशिव), सानिका चाफे, प्रतिक्षा बाराजदार, नयन काळे (सर्व सांगली), दिव्या गायकवाड, सान्वी तळवडेकर, तेजस्वी पाटेकर (सर्व ठाणे), पूर्वा वाघ (पुणे), सादिया मुल्ला (सोलापूर), साक्षी पारसेकर (मु. उपनगर), आर्या डोर्लेकर (रत्नागिरी). श्रीकांत गायकवाड (प्रशिक्षक, मुंबई), सुप्रिया गाढवे (सहाय्यक, धाराशिव), नंदिनी धुमाळ (व्यवस्थापिका, मुंबई). दरम्यान, रत्नागिरीच्या आर्या डोर्लेकर हिची या संघात निवड झाली आहे. तिने राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून चांगली कामगिरी केली होती. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.