रत्नागिरी:- कार्तिकी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून १५३ एसटी बसेस पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. प्रत्येक आगारातून त्यासाठी एसटीने गाड्यांचे नियोजन केले आहे.
आज गुरूवारी (ता. २३) एकादशी झाल्यानंतर २४ नोव्हेंबरला या सर्व गाड्या पुन्हा रत्नागिरीला परतणार आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे; मात्र या दिवसात जिल्ह्यात भात लागवडीची कामे सुरू असतात. त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला जातात. रत्नागिरी आगार वगळता अन्य सर्व आगारांतून जादा गाड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. दापोली, खेड, चिपळुण, देवरूख, लांजा, राजापूर, मंडणगड, गुहागर आगारातून एकूण १५३ गाड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.