जिल्ह्यात 49 कन्टेन्मेंट झोन; रत्नागिरी तालुक्यात नव्या चार झोनची घोषणा

रत्नागिरी:- सद्यस्थितीत रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 197 आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात कन्टेन्मेंट झोनची घोषणा करण्यात येते. जिल्ह्यात असे 49 झोन असून रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 19 गावांमध्ये कन्टेन्मेंट झोनआहेत. 
 

रत्नागिरी तालुक्यात नव्याने चार कन्टेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एस.पी बंगला रत्नागिरी, मौजे खेडशी, मौजे गणेशगुळे, मौजे वेळवंड ही चार क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

  जिल्ह्यात सध्या 49 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  दापोली मध्ये 6 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 12 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
      

मौजे पूर ता.संगमेश्वर, मौजे बामणोली ता. संगमेश्वर, मौजे मानसकाकेंड ता. संगमेश्वर, मौजे धामापूर तर्फे संगमेश्वर ता. संगमेश्वर, मौजे मुरडव ता. संगमेश्वर  भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.