रत्नागिरी:- शहरातील कर्ला बस स्टॉपजवळ बेकायदेशिरपणे ब्राउन हिरॉईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून असणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 4 नोव्हेंबर रोजी दु.12.50 वा.करण्यात आली.
फैसल मकसुद म्हसकर असे गुन्हा दाखल करण्यात आला आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात विवेक रसाळ यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,संशयित हा कर्ला बस स्टॉपजवळ बेकायदेशिरपणे ब्राउन हिरॉईन हा अंमली पदार्थ घेउन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून 21 अंमली पदार्थाच्या पुड्या असा एकूण 7 हजार 350 रुपयांचा मुददेमाल जप्त केला.याप्रकरणी संशयिताविरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम 8 (क),21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.