रत्नागिरी:- गोडावून स्टॉप येथील साई मंदिरजवळ रात्रीच्या सुमारास चोरीच्या इराद्याने लपून राहिलेल्या संशयिताला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुरुवार दि . २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वा . करण्यात आली . तुषार सुभाष पाटील असे या कारवाईदरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे . गुरुवारी शहर पोलिस गोडावून स्टॉप येथील साई मंदिरजवळून गस्त घालत होते . त्यावेळी त्यांना त्याठिकाणी संशयित हा अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवून चोरीसाठी लागणारे साहित्य जवळ बाळगून असताना गस्त घालणाऱ्या पोलिसांना आढळून आला . या संदर्भात पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पक्कड , एक्सॉ ब्लेड आढळून आले . या संदर्भात शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.