संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर 11 सदस्यांची नियुक्ती

रत्नागिरी:- शासनामार्पत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य्य देऊन त्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अशा या रत्नागिरी तालुक्यातील समितीवर अशासकीय समस्यांची नियुक्ती तहसिलदार यांच्यावतीने करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सुनील गोपाळ नावले (निरुळ) यांच्यासह अन्य 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. या योजनेचा लाभ महिला व पुरुष दोघांना दिला जाईल. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती मधील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाईल. योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते. राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी व त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.

अशा या योजनेसाठी रत्नागिरी तालुक्याच्या समितीवर नुकतीच रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार व जिल्हाअधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी मंत्री उदय सामंत यांच्याजवळचे विश्वासू सहकारी सुनिल नावले यांची निवड करण्यात आली. तर सदस्य-अनु.जाती अनु. जमाती पदी मिलींद कांबळे (फणसोप), महिला अशासकीय सदस्य श्रीमती पिती रविंद्र सुर्वे (रत्नागिरी शहर), इतर मागास वर्ग सदस्य-श्रीमती सिध्दी सुरेश शेटये (शिरगांव), सर्वसाधारण सदस्य स्वप्नील मयेकर ( पेडणेकरवाडी, कोतवडे), अपंग सदस्य पकल्प श्रीकृष्ण आराध्य ( खालचीआळी रत्नागिरी शहर), स्वयंसेवी संस्था सदस्य अभय संजीव दळी (चांदेराई), समाजसेवक सदस्य शंकर विठ्ठल झोरे (चिंद्रवली), ज्येष्ठ नागरिक सदस्य रामभाउ गराटे (पाली), सदस्य – गटविकास अधिकारी पं.स.रत्नागिरी, तर सदस्य सचिव म्हणून तहसिलदार रत्नागिरी यांचा समावेश आहे. यातील खुला पवर्ग सदस्य पद रिक्त ठेवण्यात आले आहे.