देवरूख:- संगमेश्वरजवळच्या कडवईमध्ये हरिओम ट्रेडर्स नावाने भरत साळवी (रा. सावर्डे) यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. या हार्डवेअर दुकानांमध्ये २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एकूण ४९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यामध्ये साळवी यांनी दाखल केली होती.
या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कांबळे, आव्हाड, मनवळ, कामेरकर यांनी तपास केला. दुकानांमधील कामगार शुभम सावंत (रा. तांबेडी ) याला या चोरी प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून पोलिसांनी अर्धा माल जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.