रत्नागिरी : जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज 20 जण कोरोनाचे रुग्ण आढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 580 वर पोहोचला आहे.
जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 125+1 असून आतापर्यंत 430 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शिरगाव ता. रत्नागिरी-03, जेल रोड ता. रत्नागिरी-02, मालगुंड ता. रत्नागिरी -01, गावडे आंबेरे ता. रत्नागिरी-01, राजिवडा ता. रत्नागिरी-01, घरडा कॉलनी लवेल ता. खेड-06, कुंभारवाडा ता. खेड-01, पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण-02, पेठमाप चिपळूण-01, गोवळकोट ता.चिपळूण-01, जुनी कोळकेवाडी ता.चिपळूण-01 समावेश आहे.