घरकुलाचे काम न केल्याच्या रागातून कोतवडे येथे ग्रामविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे घरकुलाचे काम न केल्याच्या रागातून ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना घडली आहे. बुधवार ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वा. हा प्रकार घडला. नितीन गंगाराम चरकरी (रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात देविदास शामराव इंगळे (वय ५६) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बुधवारी दुपारी ग्रामविकास अधिकारी देविदास इंगळे हे कोतवडे ग्रामपंचायत येथे आपले दैनंदिन कामकाज करण्यासाठी जात होते. त्यावेळी ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित नितीन चरकरीने देविदास इंगळे यांना रस्त्यात थांबवले. ‘तू माझ्या घरकुलाचे काम का केले नाहीस’ असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.