रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता शहरातील एका खासगी हॉस्पिटल मधील नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. उद्यमनगर येथे वास्तव्यास असलेली ही नर्स अनेकजणांच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
खासगी रुग्णालयातील नर्सला ताप आल्याने ती उद्यमनगर येथील एका डॉक्टरकडे उपचारासाठी देखील गेली होती. दरम्यान ही नर्स पॉझिटिव्ह आल्याने संबंधित खासगी हिस्पिटल मधील सर्व नर्स आणि स्टाफ च्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे.
दरम्यान खेडशी येथे देखील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आला आहे. ताप आल्याने या रुग्णाचा स्वॅब तपासणी केल्यानंतर हा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वाना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.