रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील चाफेरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकाचवेळी सहा कोटींच्या विकासकामांचे उद्योगमंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे, भविष्यात चाफेरीतील ग्रामस्थांना कोणताही कमतरता भासू देणार नाही असे मत ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.
चाफेरी ग्रामपंचायतीमधील प्रलंबित विकास कामांसंदर्भात येथील उद्योजक नंदू केदारी आणि अमोल बैकर यांनी स्थानिक सरपंच, उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून ना. सामंत यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. ना. सामंत यांनी या मागण्यांची तत्काळ दाखल घेत चाफेरी गावातील विकासकांना तत्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. ही आश्वासन पूर्ती तत्काळ करताना ना. सामंत यांनी चाफेरी ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांसाठी तब्बल सहा कोटींचा निधी मंजूर करून घेतला.
सहा कोटी इतक्या मंजूर निधीतून चाफेरी गावातील जलजीवन योजनेतून मंजूर झालेल्या नळपाणी योजनेची पाइपलाइन तत्काळ टाकण्यात येणार आहे. या पाईपलाईनसाठी १ कोटी २७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या शिवाय चाफेरी गावडेवाडी ते बौद्ध वाडी रस्त्याकरिता १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा एकूण सहा कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ रविवा ९ ुलै रोजी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक नंदू केदारी, पंचायत समितीचे माजी सदस्य विवेक सुर्वे, सरपंच सौ. कांबळे, अमोल बैकर, विनोद चौघुले, सुनील पाटील, दिपक पाटील, विजय धनावडे यांच्यासह चाफरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.