खेड:- शहरातील सन्मित्रनगर डाकबंगला येथे उभी करून ठेवलेली टाटा मॅजिक गाडीला शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. सुदैवाने गाडीत कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील सातेरे जामगे येथील मेटकर हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी खेड येथे आले होते. त्यांनी गाडी घराशेजारी रस्त्यावर उभी करून ते मुलीला भेटण्यासाठी गेले. याच अवधीत गाडीला आग लागली.ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याच अवधीत नगर पालिकेचा पाण्याचा टँकर बोलवून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
खेड नगरपालिकेचे कर्मचारी वाहन चालक विनय तांबे, गजानन जाधव, फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, सूरज शिगवण, प्रशांत जाधव हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र क्षणार्धात गाडी जळून खाक झाली होती.