रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हा नियोजन समितीचे नवीन सभागृह बांधणी कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आक्षेप माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे उप जिल्हाध्यक्ष मिलींद कीर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी हातात हात घालून काम करत असल्याने शहरातील सर्व कामांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
याबाबत मिलींद कीर यांनी जयस्तंभ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषद घेउन या कामाबाबत पोलखोल केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरीचे अधिक्षक अभियंता यांना देखील तक्रारीचे निवेदन दिले असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम उत्तर रत्नागिरी यांचे कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन समितीचे नवीन सभागृह बांधण्याच्या कामासाठी निविदा क.53 सन 2022-23 रोजी काढण्यात आलेली होती. तया निविदेच्या वरील नमूद केलेल्या कामाच्या पहिल्या तांत्रिक तपासणीची बाब खुली केलेली आहे. त्याचपमाणे आर्थिक तपासणीची बाबत त्वरित खुली न करता गेले 5 ते 6 महिने पेंडिंग ठेवलेली होती. त्यानंतर आता तयाच कामाची फेर निविदा क्र. 26 सन 2023-24 मधील काम क्र.4 काढण्यात आली आहे.
या कामासाठी दुसऱयांदा काढण्यात आलेल्या फेर निविदा मध्ये कामाची रक्कम बदलण्यात आलेली असल्याचे मिलींद कीर यांनी सांगितले. दुसरी निविदा काढण्यापूर्वी पहिली निविदा रद्द केल्याचे पत्रव्यवहार निविदा भरणाऱया ठेकेदारांना केलेला नाही. त्याचप्रमाणे कामाची रक्कमही वाढलेली असल्याचे सांगितले आहे. परंतु पहिल्यांदा काढण्यात आलेल्या निविदेमध्ये वाढीव काम करता येते. त्यामुळे वाढीव निविदा रक्कमेची फेर निविदा काढण्याची आवश्यकता नव्हती. तसेच ती वाढीव फेर निविदासाठी वरिष्ठ कार्यालयाची लेखी मंजूरी घेतलेली दिसून येत नसल्याचे कीर यांनी सांगितले.
या निविदा प्रकियेत फर्निचरच्या कामाच्या निविदा काढताना कामाच्या नावात फर्निचर काम करणे ह्या शब्दाचा देखील उल्लेख केलेला नाही. अशा अनेक त्रुटी निविदा प्रकियेत आलेल्या असताना बांधकाम कार्यालयामार्पत त्या सदोष निविदा प्रकियेला मंजूरी देण्यात येत असल्याविषयी कीर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अशा तऱहेने निविदा मंजूरीसाठी कोणाचेतरी लागेबंधे अथवा आर्थिक हित विचारात घेण्यात आले असल्याचा आरोप कीर यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले हे देखील उपस्थित होते.
या निविदा प्रकियेची तात्काळ सखोल चौकशी केली जावी. त्यात दोषींवर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर काढण्यात आलेली गैर निविदा स्थगित करण्यात यावी अशी मागणी केल्याचे मिलींद कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.