रत्नागिरी:- रत्नागिरी शासकीय रुग्णालयात घुसून दोघांवर झुंडीने हल्ला करण्याचा प्रकार १८ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास घडला होता. आर्थिक देवाण-घेवाणीतून जबर मारहाण करणाऱ्या संशयित पाच जणांपैकी अन्य दोघांनाही मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सोमवारी हर्षद पापय धूळप, अमेय मसुरकर आणि आशिष सावंत हे तिघे परस्पर न्यायालयात हजर झाले होते. तर अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात सोमवारी हजर झालेल्या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यातील अन्य दोन संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमित शिवलकर आणि अभिषेक पांचाळ अशी मंगळवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या अन्य दोघांची नावे आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील पाचही जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.