रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणार्या रस्त्यावर दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 18 जून रोजी रात्री 10 वा.सुमारास घडली आहे.
योगेश विठ्ठल शिर्सेकर (20, रा.हर्चे तांबेवाडी, रत्नागिरी) मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.रविवारी रात्री योगेश आपल्या ताब्यातील दुचाकीने पावस ते रत्नागिरी असा प्रवास करत असताना फिनोलेक्स फाटा येथे हा अपघात झाला असून अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान गंभिर जखमी अवस्थेतील योगेशला ग्रामस्थांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता उपचारांदरम्यान योगेशचा मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.