वर्षभरात एसटीतून फुकट प्रवास करणाऱ्या २१३ जणांवर कारवाई; ९३ हजार वसुली

रत्नागिरी:- राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील २१३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या फुकट्यांकडून ९३ हजाराचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे महिलांना एवढी सवलत दिली असली तरी त्या कुठेही फुकट प्रवास करत नसल्याचे या कारवाईमध्ये स्पष्ट दिसते.

राज्य शासनाने सर्व महिला प्रवाशांना तिकिटदरात निम्मी सवलत जाहीर केली आहे. १७ मार्चपासून महिला सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतंर्गत सर्व वयोगटातील महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे एसटीच्या भारमानात वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न काढता फुकटात प्रवास करतात. त्यासाठी एसटी प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सर्व मार्गावर सुरू केली आहे. महिला प्रवासी आवर्जून तिकीट मागून घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून अन्य २१३ फुकट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी ३५ हजार ३१२ रुपये प्रवास भाडे बुडवले होते शिवाय त्यांच्यावर ७ हजार ८७२ रुपये दंड आकारण्यात आला.

फुकट्यांकडून वर्षभरात ९३ हजार वसूल

जून २०२२ ते मे २०२३ वर्षभरात २१३ फुकटे प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी ३५ हजार ३१२ प्रवाशांनी तिकीट बुडवल्याचे निदर्शनास आले; परंतु त्यांना ७ हजार ८७२ दंड आकारण्यात आला. एकूण ९३ हजार १८४ रुपये फुकट्यांकडून वसूल करण्यात आले.