रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील वायंगणी फाट्याजवळ बेदरकारपणे तसेच विमा नसलेली बोलेरो पिकअप गाडी चालवून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्या टेम्पा ट्रॅव्हलरला धडक देत अपघात केला. अपघताची ही घटना बुधवार 7 जून रोजी दुपारी 2 वा. घडली.
या अपघातात संशयित बोलेरो चालक संतीष चंद्रकांत लाड (28,रा.तुळसणी संगमेश्वर)सह बोलेरोमधील अमोल सिध्दनाथ योगे (35) आणि आराध्या अमोल योगे (9) हे जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी संतोष आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच -08-एपी- 2872) घेउन देवरुख ते रत्नागिरी हायवेने जात होता.तो वायंगणी फाट्याजवळील वळणाच्या उतारात आला असता त्याचा बोलेरोवरील ताबा सूटला.त्यामुळे त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेने जात समोरुन येणार्या टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच- 50-एन- 4141) ला धडक देत अपघात केला.यात बोलेरो पिकअप मधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.