चिपळूण:- बँकेत एफडी करतो असे सांगून घेतलेले ५० हजार रुपये खात्यात न भरता हडप केल्याचा प्रकार चिपळूण येथे उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑगस्ट २०२२ ते ४ जून २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली . याप्रकरणी परेश रत्नदीप भुरके याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे . चिपळुणातील परेश रत्नदीप भुरके याने ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादीकडून ५० हजार रुपये घेतले होते . हे पैसे बँकेत एफडी करतो असे त्याने सांगितले होते . मात्र , परेश याने पैसे बँकेत न भरता स्वत : च्या फायद्यासाठी वापरल्याचे लक्षात आले . पैशाची मागणी करूनही पैसे परत न केल्याने चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली.