आदर्श शाळा, इस्रो- नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा १८ मे रोजी सन्मान

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना (जि. प. सेस योजना) योजनेंतर्गत ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. त्या अंतिम निवड झालेल्या 9 कनिष्ठ, 10 वरिष्ठ शाळांना पुरस्कार, केंद्र प्रमुख शिक्षक पुरस्कार वितरण तसेच इस्त्रो, नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उद्या 18 मे रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेतर्फे आयोजित केला आहे. हा कार्यकम जि.प. येथील लोकनेते शामराव पेजे सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

प्राथमिक शाळांना (जि.प. सेस योजना) योजनेंतर्गत ‘आदर्श शाळा पुरस्कार’साठी जिल्हा पातळीवरील निवड समितीने आदर्श शाळांसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. आदर्श शाळांची निवड दाखल पात्र मुले दाखल होण्याची टक्केवारी, उपस्थितांचे शेकडा प्रमाण, शाळा सिध्दी श्रेणी, सा.फु.द.पा. योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने एखादा उपकम शिक्षक राबवत असतील तर त्याची माहिती, शाळेतील उपकम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यकमाची अंमलबजावणी इत्यादी निकषांवर करण्यात आली.

या शाळांचा गौरव समारंभ 18 मे रोजी होणार आहे. त्याचवेळी इस्त्रो साठी निवड झालेल्या 27 व नासासाठी निवड झालेल्या 9 विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते आदींच्या उपस्थित होणार आहे.

निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळा पुरस्कार सन 2022-23:

कनिष्ठ प्राथमिक शाळाः जि.प. प्राथमिक शाळा तिडे बौध्दवाडी (मंडणगड), जि.प. प्राथमिक शाळा मुर्डी नं.1 (दापोली), जि.प. प्राथमिक शाळा चिंचघर मेटकर डाऊल (खेड), जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.2 (चिपळूण), जि.प. प्राथमिक शाळा जानवळे नं.3 (गुहागर), जि.प. प्राथमिक शाळा कोळंबे नं.1 (संगमेश्वर), जि. प. प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी (रत्नागिरी), जि.प. प्राथमिक शाळा बेनी बु. गुरववाडी नं.4 (लांजा), जि.प. प्राथमिक शाळा बेणगी (राजापूर).

वरिष्ठ प्राथमिक शाळाः जि.प. प्राथमिक शाळा ढांगर (मंडणगड), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोळबांद्रे नं.1 (दापोली), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नांदिवली दंड (खेड), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पोसरे नं.1 (चिपळूण), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा (गुहागर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोंड्ये नं.2 (संगमेश्वर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणी खाडेवाडी (संगमेश्वर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळप नं.1 (रत्नागिरी), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड नं.1 (लांजा), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा चिखलगाव (राजापूर).

केंद्रपमुख पुरस्कार-संतोष तारवे (केंद्राचे नाव-केंद्र तुळसणी व कोंड्ये नं. 1, संगमेश्वर)

अमेरिकेतील ‘नासा’ सफारीसाठी निवड झालेले विद्यार्थी:- प्रभुती संतोष घागरूम (जि.प.प्राथमिक शाळा कोन्हवली, मंडणगड), धनश्री संजय जाधव (जि.प.प्राथमिक शाळा शिरसोली नं.1, दापोली), वेदांत विठ्ठल मोरे (जि.प.प्राथमिक देवघर निवाचीवाडी, खेड), अभय शिवराम भुवड (जि.प.प्राथमिक शाळा, तुरंबव, चिपळूण), सोनाली मोहन डिंगणकर (जि.प.प्राथमिक शाळा काजुर्ली नं.2, गुहागर), आरोही दिनेश सावंत (जि.प.प्राथमिक शाळा, ओझरखोल, संगमेश्वर), वेदांत बाबुराव सनये (जि.प.प्राथमिक कुवारबाव महालक्ष्मीनगर, रत्नागिरी), आशिष अनिल गोबरे (जि.प.प्राथमिक शाळा शिरवली, लांजा), भूषण चंद्रकांत धावडे (जि.प.प्राथमिक शाळा, पांगरे बु. राजापूर) यांचा सत्कार होणार आहे.