देवरुख:- देवरुख रत्नागिरी मार्गावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात देवरुख येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
अक्षय सिताराम साळवी (रा. देवरुख मधली आळी) हा शुक्रवारी सकाळी आपल्या ताब्यातील पल्सर ही दुचाकी घेऊन निवळीकडे जात होता. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वायंगणे येथील वळणावरून जात असताना, दुचाकी वरील अक्षय चे नियंत्रण सुटले, अन दूचाकी बाजूला जाऊन आदळली. यात अक्षयच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
अक्षयला तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय सूत्रांनी अक्षय मृत असल्याचे घोषित केले. शवविच्छेदन करून अक्षयचा मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.