रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील तीन दिवसात १६ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर मागील २४ तासात ६ बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे उपचारा खाली असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २३ इतकी झाली असून यातील १६ रुग्ण गृह विलिगीकरणात तर ७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यापैकी १६ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत तर ७ रुग्णांना लक्षणे दिसून आली आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे नगण्य असेल तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. लक्षणे आढळून आल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.