रत्नागिरी:- गेले काही दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. राजापूर, चिपळूण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. रविवारी सकाळी रत्नागिरी शहर परिसरात सकाळच्या सत्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर काही भागात किरकोळ स्वरुपात पाऊस पडला. सकाळी सातनंतर ढगाळ वातावरण असून हवेत उष्मा वाढला. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या साथीत वाढ होण्याची भीती आहे.