रत्नागिरी:- पिठाच्या चक्कीत पाय अडकून गिरणी मालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7वाजण्याच्या सुमारास राम आळी परिसरात घडली. जखमी झालेल्या अनिल भार्गव पोटफोडे यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल पोटफोडे यांची राम आळीमध्ये पिठाची चक्की असून शनिवारी ते नेहमीप्रमाणे चक्कीत पीठ काढीत असताना त्यांचा पाय अचानक चक्कीच्या पट्ट्यावर पडला. त्यांचे दोन्ही पाय चक्कीच्या पट्ट्यात अडकल्याने दोन्ही पायाना गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना घडताच त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ततकाळ कोल्हापूर येथे हलविण्यात आले.
दरम्यान यापूर्वी देखील त्यांचा असाच अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या बोटाला गंभीर इजा झाली होती. पोटफोडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच राम आळीतील दुकानदारांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.