प्रभाग क्रमांक ५ कचरा मुक्त ठेवण्यासाठी सौरभ मलुष्टे यांचे विशेष प्रयत्न

स्वखर्चातून प्रभाग कचरामुक्त करण्यासाठी घेतला पुढाकार

रत्नागिरी:- साळवी स्टॉप हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार असून येथील एका खाजगी जागेत टाकण्यात येणारा कचरा येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता.या परिसरातील नागरिकांनी येथील युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
नगर परिषद प्रशासनना खासगी जागा असल्याने तेथील कचरा उचलण्यास नाकार दिला.अखेर नागरिकांची समस्या लक्षत घेत सौरभ मलुष्टे यांनी स्वखर्चातून कचरा उचलून सदरचा परिसर स्वछ करून दिला.

सदरच्या मोकळ्या जागेत कचरा साठून परिसर अतिशय अस्वछ झाला होता.प्रभागात स्वछता राहण्यासाठी सौरभ मलुष्टे हे नेहमीच पुढाकार घेतात,प्रशासनाने केले तर ठीक अन्यथा ते नेहमीच स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात.सौरभ मलुष्टे यांनी कचरा उचलण्यासाठी योग्य नियोजन केले. स्वखर्चातून २ ट्रॅक्टर,जे.सी.बी व खासगी कामगार लावून कचरा उचलण्यात आला व सर्व तिथला परिसर स्वछ करण्यात आला.कचऱ्याची समस्या मार्गी लागताच येथील नागरिकांनी मलुष्टे यांचे आभार व्यक्त केले.