जाकादेवी येथे घरातून महिलेच्या पर्समधील एक लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील महिलेच्या घरातील पर्समधून सुमारे ९१ हजार २५० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची संशयित वृद्धाने चोरी केली. ही घटना सोमवार २० मार्च रोजी सकाळी ८ ते ८.३० वा सुमारास घडली आहे.

संशयितविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ सिताराम बने ( ६८, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वृद्धाचे नाव आहे. त्याच्याविरोधात वर्षा व्यंकट चव्हाण (५९, रा. पेट्रोल पंपाचे अलीकडे जाकादेवी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,त्यांच्या घरातून संशयित वृद्धाने सोने व रोख रक्कम असा ९१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.