रत्नागिरी:- कोकण पट्ट्यालाही अवकाळीचा इशारा देताना रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार 18 मार्चपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची अधिक शक्यता असल्यामुळे येथील आंबा, काजू बागायतदार शेतकरी चिंतेत पडले आहेत.
राज्यात ऐन मार्च मध्येच बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे साऱयांनाच चकावून सोडले आहे. शेतकऱयांनी तर या अस्मानी संकटामुळे डोक्याला हात टेकले आहेत. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु त्यात गुरुवार आणि शुक्रवारी देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गुरुवारी 13 जिह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर शुक्रवारी 17 मार्च रोजी 9 जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी 18 मार्चपर्यंत राज्यातील ढगाळ वातावरण निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणालाही अजून दोन दिवस हवामान विभागाने यलो अलर्ट दिलेला आहे. सोसाट्याच्या वाऱयासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्dयात कमालीचे तापमान वाढलेले आहे. दिवसभर पचंड तापमानामुळे सर्वत्र रखरखाट असल्याची स्थिती आहे. त्यामुळे सारेच हैराण होताना दिसत आहेत. त्यात राज्यावरील अवकाळीच्या संकटामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण दाटलेले आहे. सकाळच्यावेळेत पचंड धुक्याची चादर पहायला मिळत आहे. अशातच बुधवारी रात्री रत्नागिरीच्या अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला. आता शुकवार 17 व 18 मार्च पर्यंत या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही दोन दिवस ढगाळ वातावरणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार चिंतेत पडलेले आहेत. सोसाट्याचा वार्यासह पाउस बरसल्यास आंबा, काजू पिकाला मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.