रत्नागिरी:- रत्नागिरी कोकणनगर मार्गे करबुडेकडे जाणाऱ्या मार्गावर कार आणि ॲक्टीव्हा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला.
रत्नागिरीहून करबुडेच्या दिशेने जाणारी कार (एम एच 08, 5504) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विरूद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीवरील स्वार गंभीर जखमी झाला आहे. तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून ड्रायव्हरच्या बाजुचा टायर फुटला आहे. यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते.