सार्वजनिक ठिकाणी बिअरची बाटली हातात घेउन जाणार्‍या तरुणावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथे दारु पिण्याचा परवाना नसताना बिअरची बाटली हातात घेउन चालत जाणार्‍या तरुणावर जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वा.करण्यात आली आहे.

राहुल शेखर पडवळ (28, रा.वरचे वरवडे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस शिपाई सागर गिरीगोसावी यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार बुधवारी सायंकाळी राहुल त्याच्याकडे दारु पिण्याचा परवाना नसताना 750 मिलीची बिअरची बाटली हातात घेउन चालत जात असताना त्याला थांबवून त्याची चौकशी केली.असता त्याच्याकडे दारु पिण्याचा परवाना नसल्याचे समजल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.