कोकणात महाविकास आघाडीला धक्का; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

रत्नागिरी:- शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पहिला निकाल हाती आला असून कोकणात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोकणात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मतं मिळाली आहेत. मविआच्या बाळाराम पाटील यांचा पराभव त्यांनी केला आहे. 

याच पार्श्वभूमीवर विजय मिळवल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, माझा विजय हा सर्व शिक्षकांचा आहे. माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवला. शिक्षकांच्या पेन्शंनचा प्रश्न सोडवणार असल्याचे भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले आहे.