दापोलीत फिरायला आलेल्या तरुणाचा मृत्यू 

दापोली:- दापोली तालुक्यात हर्णे येथे फिरायला आलेल्या 29 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक पुणे येथील आहे. दापोली तालुक्यात रविवारी 29 वर्षीय पर्यटक पर्यटनासाठी आला होता. 

सुनील सिंग राजसिंह कुशवाह (सध्या राहणार मांजरी, पुणे) असे या पर्यटकाचे नाव आहे. मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ दापोली येथील दोन खाजगी खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आले तेथून त्याला दापोलीत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावरती उपचार सुरू असताना त्याचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आठ ते दहा जणांचा ग्रुप दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आला होता. त्यात हा युवक होता. हर्णे पाळंदे परिसरात एका रिसॉर्ट मध्ये हा ग्रुप थांबला होता. यावेळी या ग्रुपमधील या २९ वर्षीय युवकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दापोली पोलीस संदर्भात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत