वांद्री येथे भरधाव कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर; विद्युत पोल तुटल्याने वीज पुरवठा खंडित 

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील वांद्री येथे भरधाव कंटेनर पलटी होऊन चालक जखमी झाला. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात पोल तुटून पडल्याने परिसरातील नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

संगमेश्वर येथून गोव्याच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगाने निघाला होता. वांद्री येथील उतारावर चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याकडेला असलेल्या विद्युत पोलसहीत पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. 

येथील ग्रामस्थांनी कंटेनर चालकाला वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र कंटेनर पलटी झाल्यानंतर पूर्ण प्राथमिक शाळेच्या काही अंतरावरच तो थांबल्याने शाळा मात्र बचावली आहे. अन्यथा शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. अपघाता नंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात विद्युत पोल पडल्याने महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले.