रत्नागिरी:- जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण सापडून आला. मोठ्या कालावधीनंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली. मंडणगड तालुक्यात पाल्ये गावात सापडलेल्या रुग्णाचा मंगळवारी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
सापडलेला रुग्ण वयोरुद्ध असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. संबंधित रुग्ण तीन वर्षे मंडणगड मध्येच वास्तव्याला असून त्याला इतर आजार देखील होते. रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्टमोडवर असून तुर्तासतरी कोणतीही चिंता करण्याच कारण नाही असे आरोग्य विभागाने कळवले आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाला उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. या रुग्णाच्या सहवासातील इतर कोणालाही कोणतीच लक्षणे नसून नागरिकांना घाबरण्याचे कोणतेच कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.