योजनांचा धडका तरीही रब्बीतील लागवड पिछाडीवरच

रत्नागिरी:- यावर्षी परतीच्या पावसाने  कोकणात भात शेतीच्या हानी बरोबरच आंबा हंगामही अडचणीचा झाला. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकर्‍यांना लागवडीसाठी उद्युक्त करण्यासाठी विविध योजनांचा धडाका सुरू असताना कोकणात मात्र रब्बी हंगमातील लागवड अन्य विभगाच्या तुलनेने पिछाडीवर आहे. राज्यातील अन्य विभागांनी दमदार पावसाचा लाभ घेतना रब्बी हंगामात लागवड करण्यात आघाडी घेतली आहे.

कोकणात खरिपात पारंपारिकपद्धतीने भात आणि नागलीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, त्यानंतर रब्बी हंगमात लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचा झुकत झालेले कल लक्षात घेऊन कोकणातील शेतकर्‍यांना रब्बीत लागवड करण्यासाठी उद्युक्त करण्यात आले होते. यासाठी बियाणांपासून ते खतापर्यंत अनुदान योजना शेतकर्‍यांच्या थेट बांधावर नेण्यासाठी विविध योजनांंची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, कोकणात रब्बी हंगामात शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत कृषी विभागाने  व्यक्त केली आहे. रब्बी हंगामात दवाच्या सिंचनावर कडधान्याबरोबर शेंगभाज्या घेतल्या जातात मात्र त्याचेही प्रमाण यंदा कमी आहे.

अन्य विभगात मात्र पावसाने हानी केल्याने  रब्बी हंगमाचा फायदा शेतकर्‍यांनी घेतल्याचे चित्र आहे.  पुणे विभागाने  आघाडी घेताना 86 टक्के पेरण्या केल्या आहेत. नागपूर विभागात 67, औरंगाबाद 56, नाशिक विभागात 70 टक्केरब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. मात्र, अमरावती आणि कोकण विभागात पेरण्यांचा टक्का खाली आहे. त्यामध्येही अमरावतीत विभागात 47 टक्के तर कोकणात 40 ते 42 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 

चार महिन्याच्या खरीप हंगमाव्यतिरिक्त रब्बीतही लागवड करताना दवाच्या सिंचनावर कडधान्यात चवळी, पावटा, शेेंंगभाज्या आदी उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी  परतीचा पाऊस दीर्घकाळ राहिल्याने भात शेतीतच अतिरिक्त वेळ गेला. त्याच बरोबर रब्बीत लागवड करताना माकडांकडून करण्यात येणार्‍या हानीचाही त्रास आहे. त्यामुळे होणारे नुकसान पाहता रब्बीत लागवड करण्यातील  अडचणीत वाढ झाली असल्याचे नाणीज येथील शेतकरी तानाजी दर्डी यांनी सांगितले.