रत्नागिरी:- रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील इरमलवाडी येथे कार आणि ट्रक यांच्या 2 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. या धडकेत एक महिला ठार तर 5 जण जखमी झाले होते. अपघातात एकाच्या मृत्यूस व 5 जण जखमी झाल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार चालकाचे नाव माहीत नसून (एम एच 01, डिपी 2658) या गाडी चालकावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर नानिज येथे 2 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मालवाहू ट्रकवर समोरून येणारी कार विरूद्ध दिशेला येऊन आदळली. या धडकेत ती कार रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यातील एक महिला ठार झाली. पाच जण गंभीर जखमी झाले. सुवर्णा शिवराम नागवेकर (वय- ७०, फणसवने, वाडावेसराड, संगमेश्वर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हरिचंद्र वासुदेव वारंग (38, खारघर), हर्षला हरिचंद्र वारंग (58,खारघर), सुनील पेडणेकर (53, भोईवाडा), सुषमा पेडणेकर, अर्चना दगडे (52, सायन, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
ट्रक (एमएच ०९ सीए ३१२४) जयगडहून सोलापूरला चालला होता. ट्रकचालक मंजुनाथ शिद्राय पाटील (वय – 38 रा. उंब्रज ता. इंडी, जि. विजापूर, असे त्याचे नाव आहे. दरम्यान नाणीज येथील इरमलवाडी वाडी येथील वळणावर या समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०१डीपी२६५८) ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात ही कार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली आहे. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. सर्व जण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी चाललेले होते. यातील सुवर्णा शिवराम नागवेकर रा. वाडावेसराड, फनसवणे (भंडारवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. विरूद्ध दिशेला येऊन कार चालकाने ठोकर देऊन एकाच्या मृत्यूस व 5 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.