नाचणे पांडवनगर बिल्डिंगच्या पार्किंगमधील बुलेटची चोरी

रत्नागिरी:– शहरालगतच्या नाचणे पांडवनगर येथे गोविंद अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली बुलेट चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार सुमित चिपळूणकर (मुळ, गुहागर, सध्या पांडवनगर, नाचणे ) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित चिपळूणकर हे 28 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत आपल्या मूळ गावी गुहागर येथे गेले होते. 21 नोव्हेंबर रोजी ते नाचणे येथे आले असता पार्किंग मध्ये लावलेली बुलेट दिसून आली नाही. शोधाशोध घेऊन ही न सापडल्याने त्यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. 50 हजार रुपये किमतीची बुलेट चोरीस गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञातावर भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.