खेड:- येथे बंद घर फोडून दागिन्यांसह 60 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत खेड पोलीस स्थानकात अब्दुला प्रशांत खोत (36, खेड) यांनी तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 11 वा. च्या दरम्यान घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुला हे घर बंद करुन बाहेर गावी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञाताने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात असलेली 15 हजार रुपयांची सोन्याची चेन, 5 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 8 हजार रुपयांची सोन्याची चेन 1070 रुपयांची सोन्याची चमकी, 6 हजाराची सोन्याची चेन, 2 हजारांचे सोन्यातील कानातील टॉप, 2 हजार रुपयांचा मोबाईल, 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 59 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान 21 नोव्हेंबर रोजी अब्दुला हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केला तर घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.