सोलापुरातील बेपत्ता महिला सरपंच सापडली रत्नागिरीत

रत्नागिरी:- परजिल्ह्यातील बेपत्ता महिला सरपंच रत्नागिरीत सापडली आहे. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी सौंदरे गावातून 4-5 दिवसांपूर्वी अचानक गायब झाली होती. तिच्या गायब होण्याचे कारण पोलिसांना समजत नव्हते. मात्र नातेवाईकांनी सोलापूर पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची खबर दिली. या खबरीवरून, त्या महिलेचा सर्वत्र शोध सुरू होता. सोलापूर पोलिस तपासाच्या दृष्टीने माहिती मिळताच शोधकार्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले.

इकडे त्या सरपंच महिलेचा फोटो व वर्णन महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांत पोचवण्यात आले. तसेच, सोशल मिडियाच्या माध्यमातूनही चौकशी सुरू झाली. सोशल मिडियातून आलेली माहिती पाहून काही नागरिकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमात ही महिला थांबलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या थांबलेल्या सरपंच महिलेची माहिती दापोली पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी संबंधित वर्णनाची महिला आश्रमात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जाऊन प्रत्यक्ष खातरजमा केली. त्यावेळी सौंदरे गावच्या सरपंच असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेला ताब्यात घेऊन सुखरूप सोलापूर पोलिस पुन्हा रवाना झाले. आणि तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.