रत्नागिरी:- शहरातील मुरूगवाडा येथे जुगारावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. जुगार खेळणाऱ्या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 44 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.
मुरूगवाडा येथे तीनपत्ती जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचला. रात्री सवा वाजता सुरूवातीला साध्या वेशातील एक पोलीस आत पाठवण्यात आला. त्यानंतर आत जुगार सुरू असल्याची खबर मिळताच पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या धाडीमुळे जुगारात रमलेल्या मंडळींच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.पोलिसांनी चारही बाजूने घेराव घालून जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.त्यामध्ये महेंद्र मांजरेकर (45 रा.मुरूगवाडा), अनंत मयेकर (57 रा.मुरूगवाडा), रोहित चव्हाण (25 रा.मुरूगवाडा), संतोष नागवेकर (42 रा.मुरूगवाडा), सुरेंद्र सुर्वे (39 रा. पेठकिल्ला), राकेश पारकर (34 रा. मुरूगवाडा), शेखर भोंगले (47 रा. मुरूगवाडा), सतेज मयेकर (40 रा. मुरूगवाडा), सचिन सुर्वे (47 रा. मुरूगवाडा), जितेश पाटील (32 रा. मांडवी), शिवाप्पा कोळी (41 रा. मुरूगवाडा), सचिन मयेकर (35 रा. मुरूगवाडा) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 44 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.