गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात 50 हजार चाकरमानी दाखल

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला रत्नागिरीत रेल्वे, एसटी, खाजगी बसेस यासह खाजगी वाहनांमधून सुमारे पन्नास हजारहून अधिक चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आरोग्य विभागाकडून केलेल्या तपासणींमध्ये दोन कोरोना बाधित सापडले असून 34 जणांना कोरोनासंदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्याप्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाकडून रेल्वे, एसटी बसस्थानकासह महामार्गांवर एकवीस ठिकाणी पथके ठेवलेली होती. गावागावांमध्ये येणार्‍या चाकरमान्यांवर आरोग्य विभागाने करडी नजर ठेवलेली होती. कोरोनाचा प्रादुर्भात कमी झाला असला तरीही अनेक ठिकाणी बाधित सापडत आहेत. चाकरमान्यांमार्फत याचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना बाधितांची तपासणी करण्यात येत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना सुचना देऊन कुटूंबातील लोकांशी त्यांचा टाळण्यास सांगितले जात आहे. 29 ऑगस्टपर्यंत 32 हजार 261 चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यात रेल्वेने 10 हजार 633, एसटीने 3 हजार 529, खाजगी ट्रॅव्हल्सने 2 हजार 924 आणि खासगी वाहनातून 2 हजार 924 प्रवासी आले. 30 ऑगस्टला सायंकाळपर्यंत दहा हजाराहून अधिक चाकरमानी गावागावात आले आहेत. कोरोना सदृश्य चाकरमान्यांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. त्यामध्ये 22 जणांच्या आरटीपीसीआर तपासण्या केल्या. त्यात एकही बाधित सापडला नाही. अ‍ॅण्टीजेन तपासणीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 2 जणं कोरोना बाधित आढळले. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच 34 जणांना कोरोना सदृश्य ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत. त्यांना मास्क लावण्यासह त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहेत.